
भाऊ पाय घसरुन तलावात पडला, मोठ्या भावानेही पाण्यात उडी घेतली, एकमेकांना मिठी मारली अन्...
शनिवार, २५ मार्च, २०२३
Comment
सांगली: तलावामध्ये पडून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. अय्याज युनूस सनदी (वय ९) आणि अफान युनूस सनदी (वय ५) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांची नावे आहेत.अय्याज आणि अफान हे दोघेही शाळा सुटल्यावर घराकडे निघाले होते. दरम्यान गावातील नागरगोजे वस्तीवरील शासकीय तलावा शेजारून जाताना लहान भाऊ अफानचा पाय घसरला आणि तो तलावात पडला. आपला लहान भाऊ तलावात पडला हे पाहून अय्याजने त्याला वाचवण्यासाठी थेट पाण्यात उडी घेतली. लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारली. पण, तो अय्याज ना अफानला वाचवू शकला ना स्वत:चा जीव वाचवू शकला. अखेर पाण्यात बुडून या दोन्ही भावांनी जीव गमावला.या घटनेनंतर सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेने मिरज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
0 Response to "भाऊ पाय घसरुन तलावात पडला, मोठ्या भावानेही पाण्यात उडी घेतली, एकमेकांना मिठी मारली अन्..."
टिप्पणी पोस्ट करा