
फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न
सोमवार, ६ मार्च, २०२३
Comment
फुलंब्री लोकसवाल न्यूज प्रतिनिधी-फुलंब्री तालुक्यातील किनगांव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार श्री.हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील कामे अंदाजे १४,२१,६०,००० रुपयांच्या निधीतून केले जाणार आहेत. यामध्ये समावेश असलेली कामे :१) गणोरी फाटा ते येसगाव फाटा खुलताबाद रोडपर्यंत रस्ता पुलमोऱ्यासह सुधारणा करणे. (अंदाजित किंमत ८ कोटी ७६ लक्ष रुपये.)२) किनगांव ते किनगांव फाटा पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे. (किंमत २ कोटी ८० लक्ष रु.)३) किनगांव येथील पशुवैद्यकिय रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. (अंदाजित किंमत १ कोटी २० लक्ष रु.)४) महिला बालकल्याण जिल्हा परिषद निधीतून २ अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम करणे. (अंदाजित किंमत २२ लक्ष ६० हजार रु.)५) रोजगार हमी योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. (अंदाजित किंमत २० लक्ष) ६) जिल्हा परिषद निधी अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे. (अंदाजित किंमत ३ लक्ष)सदरील कामांमुळे गावाचे रूप बदलणार आहे. यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. याप्रसंगी मुख्य अभियंता श्री.अतुलजी चव्हाण, श्री.विजय औताडे, श्री.सुहासभाऊ शिरसाठ, श्री.जितेंद्रबाबा जैस्वाल, श्री.सर्जेराव मेटे, किनगांवच्या सरपंच सौ.मनिषाताई चव्हाण, गणोरीच्या सरपंच सौ.सरलाताई तांदळे, सौ.ऐश्वर्या गाडेकर, श्री.नाथअप्पा काकडे, श्री.पंडितभाऊ जाधव, श्री.बाळु तांदळे, श्री.सुचित बोरसे, श्री.रवींद्र गायकवाड, श्री.कैलास सोनवणे, फारुखभाई शेख, इतर मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न"
टिप्पणी पोस्ट करा