%20(5).jpeg)
पवित्र रमजानला उद्या पासून होईल सुरुवात
लोकसवाल न्यूज प्रतिनिधि: शाहरुख शेख
औरंगाबाद: दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा गुरुवार, २३ मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर पवित्र रमजानला सुरुवात होईल, शुक्रवारी पहिला रोजा असेल. यानिमित्ताने शहरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. मशिदींमध्ये रात्री 'तरावीह'च्या नमाजसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यादृष्टीने सर्वत्र तयारी सुरू आहे. या महिन्यात लहान लहान चिमुकले पण रोजे ठेवतात हे उपवास म्हणजे 14ते 15तासाचा असतो तरी देखील लहान चिमुकले पहाटे उठून सहेरी करतात व आनंदात रोजे ठेवतात
लहान असो किंवा मोठा गरीब असो किंवा श्रीमंती अल्लाहकडे सर्वच समान आहेत. या महिन्यात खुल्या मनाने माफी मागितल्यानंतर सर्व गुन्हे माफ होतात. रमजान ईदनंतर सहा उपवास अनेक मुस्लिम बांधव ईदनंतर ही ठेवतात. त्याचप्रमाणे मोहर्रम, बकरी ईद, शाबान आणि रज्जब महिन्यात उर्वरित उपवास ठेवण्यात येतात. नफिल रोजे ठेवण्याचे पुण्यही तेवढेच आहे.
0 Response to " पवित्र रमजानला उद्या पासून होईल सुरुवात"
टिप्पणी पोस्ट करा