
सरपंचाने पंचायत समिती आवारात पाडला पैशांचा पाऊस; विहीरींसाठी केली होती लाचेची मागणी
शुक्रवार, ३१ मार्च, २०२३
Comment
फुलंब्री तालुक्यातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक सरपंच गळ्यात नोटांची माळ घालून येतो आणि पंचायत समितीच्या आवारात पैशांची उधळण करतो.फुलंब्री पंचायत समितीच्या आवारातील हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओमध्ये तरुण सरपंचाने स्वतः सगळी माहिती दिलीय. मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. गावातील विहीरी मंजुरीसाठी पैसे मागितीतले असल्याने त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले.
0 Response to "सरपंचाने पंचायत समिती आवारात पाडला पैशांचा पाऊस; विहीरींसाठी केली होती लाचेची मागणी"
टिप्पणी पोस्ट करा