
सिल्लोड-पाचोरामहामार्गावरील वांगी फाट्याजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
Comment
सिल्लोड-पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार या अपघातत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यामधील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सहाच्या दरम्यान सिल्लोड-पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. अपघात झालेल्या बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील टेम्पो पलटी झाल्याचे दिसत आहे टेम्पो मधील सिलेंडर रस्त्यावर पडले आहेत. दूसऱ्या बाजूला एसटी बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांची मदत करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. आणि रुग्णवाहिका बोलावून अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.
0 Response to "सिल्लोड-पाचोरामहामार्गावरील वांगी फाट्याजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि एसटी बसमध्ये भीषण अपघात"
टिप्पणी पोस्ट करा