
आठवी ते दहावी पर्यंत सोबत शिकलेले जुन्या मित्रांची३३ वर्षांनी भरली शाळा
गनोरी(ता.फुलंब्री)
एकमेकांचे बदलले चेहरे, राहणीमान, बोलीभाषा याचं निरीक्षण करीत तब्बल ३३ वर्षानंतर गणोरी येथील स्नेहमिलन दरम्यान एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांची डोळे आनंदी अश्रूंनी भरून आले.गनोरी येथील जि. प्रा शाळातील १९९० या कालावधीत आठवी ते दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परिक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. डॉ युनूस शाह,सय्यद मुख्तार, सचिन,सुनिता,कोमल, शारदा,शोभा, सिमा, यांनी सर्व वर्ग मित्रांना व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणून सर्वांनी तब्बल तेतीस वर्षांनी भेटण्याचे ठरविले या वेळी ५०पेक्षा आधिक माजी वर्गमित्र एकत्र येऊन नव्या जुन्या आठवणींना उजाला देत एकमेकांच्या परिवाराविषयी व कामकाजाविषयी चर्चा केली.स्नेह संमेलन मेळावा सृष्टी लॉन्स ऍग्रो टुरिझम हॉटेल नगर रोड जिकठाण फाटा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ युनूस शहा यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. व शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला
0 Response to " आठवी ते दहावी पर्यंत सोबत शिकलेले जुन्या मित्रांची३३ वर्षांनी भरली शाळा"
टिप्पणी पोस्ट करा