
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून रिक्षावर पडली लोखंडी सळई, मायलेकीचा मृत्यू
शनिवार, ११ मार्च, २०२३
Comment
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या मायलेकीचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला असून सहा वर्षाच्या मुलीचा उपचारदरम्यान मृत्य मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास एक महिला आणि तिची लहान मुलगी जोगेश्वरी स्टेशन रोडवरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एका इमारतीचा बांधकाम सुरू असताना त्या बांधकामच्या ठिकाणाहून चौथा मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडली. ही सळई या मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोगेश्वरी पोलीस दाखल झाले. अपघातनंतर महिलेला आणि तिच्या मुलीला जवळच्या ट्रामा केयर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
0 Response to "इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून रिक्षावर पडली लोखंडी सळई, मायलेकीचा मृत्यू"
टिप्पणी पोस्ट करा