
लोकांचे पैसे देण्यासाठी महिलेचा केला खून गुन्हे शाखेकडून सहा तासांत खुनाचा उलगडा
शनिवार, ११ मार्च, २०२३
Comment
फुलंब्री लोकसवाल न्यूज प्रतिनिधी-लोकांकडून घेतलेले पैसे देण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीनेच गळा दाबून महिलेचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) निधोना येथे उघडकीस आली. या प्रकरणी बाळू कारभारी दाबके (रा.) बहिरगाव ता. कन्नड) याच्या विरोधात वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मंदाबाई बाबासाहेब राऊतराय (वय ४५, रा. निधोना) ही तिच्या राहत्या घराच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रकरणाचा तपास करीत असताना मंदाबाई राऊत राय यांचा मृत्यू आकस्मित नसून त्यांची हत्या झाली असावी असा संशय आला. त्या दृष्टीने गुन्हेशाखा तपास करीत असताना सूत्रांच्यामाहितीवरूनपोलिसांनी बाळू कारभारी दापके (रा.)बहिरगांव ता. कन्नड) यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने लोकांकडून व्याजाने घेतलेले ५० हजार रुपयांची परत फेड करण्यासाठी मंदाबाईराऊतराय यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. मंदाबाई यांच्या जवळील दागिणे विक्री करून लोकांचे पैसे परत देता येईल या उद्देशाने संशयित आरोपी ९ मार्च रोजी नेहमीप्रमाणे मयत मंदाबाई मांना भेटण्यासाठी गेला होता. रात्रभर त्यांच्याकडेच मुक्कामी राहिला. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्याने मंदाबाई राऊतराय यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेगे, पोलिस उप निरीक्षक विजय जाधव, प्रदीप दुबे, गजानन लहासे, बालू पाथ्रीकर, पो.हे.कॉ नामदेव सिरसाठ, पो.ना, नरेंद्र खंदारे, ज्ञानेश्वर मेटे, संजय सादळे, संतोष डमाळे, योगेश तरमळे,जिवन घोलप यांनी केली आहे.
0 Response to "लोकांचे पैसे देण्यासाठी महिलेचा केला खून गुन्हे शाखेकडून सहा तासांत खुनाचा उलगडा"
टिप्पणी पोस्ट करा