
औरंगाबादच्या नामांतरासाठी आंदोलकांनी काढला कॅन्डल मार्च
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Comment
औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत गुरुवारी रात्री कैंडल मार्च काढण्यात आला.
शहराचे नाव औरंगाबादच कायम ठेवावे, अशी मागणी करत हजारो महिला पुरुष यात सहभागी झाले.
राज्य व केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर केले. याविरोधात औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी कँडल मार्च काढण्यात आला. याचे नेतृत्व महिलांनी केले. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
0 Response to "औरंगाबादच्या नामांतरासाठी आंदोलकांनी काढला कॅन्डल मार्च"
टिप्पणी पोस्ट करा