%20(3).jpeg)
बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला?; परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
Comment
बुलढाणा= बुलढाण्यामध्ये परीक्षेआधीच बारावीचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं जातंय.सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. आज गणिताचा पेपर आहे. मात्र सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर पेपर व्हायरल झाला.गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही.बोर्डानेदेखील पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सिंदेखडराजा येथे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. विद्यार्थ्यांकडे खरंच पेपर पोहोचला होता का? याबाबत यंत्रणा तपास करत आहे.
0 Response to " बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटला?; परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा"
टिप्पणी पोस्ट करा