
एच3एन2 चे शहरात 21 रुग्ण ऍक्टिव्ह, अधिकारी यांनी दिली माहिती
शुक्रवार, १७ मार्च, २०२३
Comment
AURANGABAD - सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. एच3एन2, एच1एन1 तसेच कोविडचे रुग्ण आढळून येत आहे. काही रुग्णांचे स्वॅप हे तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या शहरांमध्ये कोविडचे 21 रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी दिली आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला ताप होत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण काळजी घेणे आवश्यक आहे. कोविडचे नियम पाळण्याची गरज आहे. बाहेर फिरताना गरजेच्या ठिकाणी फिरताना मास्क लावावे, हातात हात घेऊ नये, शिंकताना नाकावर हात ठेवावा आणि इतर काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केले आहे.
0 Response to "एच3एन2 चे शहरात 21 रुग्ण ऍक्टिव्ह, अधिकारी यांनी दिली माहिती"
टिप्पणी पोस्ट करा