
वीस गुंठे शेतात विदेशी पालेभाज्यांची लागवड करून शेतकरी घेत आहे लाखो रुपयांचे उत्पन्न
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
Comment
BULDHANA : बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला, आणि युट्युब च्या माध्यमातून माहिती घेऊन आपल्याकडे असलेल्या दोन एकर शेती पैकी दीड एकर मध्ये पारंपारिक पिकासोबत अर्धा एकर शेतामध्ये विदेशी पालेभाज्यांची लागवड करुन त्या पालेभाज्या व्यापाऱ्यांना न विकता स्वतः बाजारपेठात जाऊन विक्री करतो. या माध्यमातून चार महिन्यांमध्ये अर्धा एकरात जवळपास सव्वा लाखाचे निव्वळ उत्पन्न घेत आहेत. दीड एकर शेतीमध्ये पारंपारिक शेती करतात.त्यामध्ये गहु, हरभरा यांसारखे इतर पिकांचा समावेश आहे.
अर्धा एकर शेतीमध्ये विदेशी भाज्यांची लागवड करतात. त्यामध्ये ब्रोकली,रेड कॅबेज, लेटुस, सॅलेरी,झुकिनी, लोलोरुसा, टरनिप, शलगम अश्या २२ ते २५ प्रकारच्या भाज्यांची लागवड होते.
एकीकडे नापिकेमुळे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे केवळ अर्धा एकरात शेतकरी लाखोचे उत्पन्न घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला जोड म्हणून आधुनिक पद्धतीने पालेभाज्याची शेती केल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही,असे आवाहन देखील विष्णू गडाख यांच्याकडून इतर शेतकऱ्यांना केले जात आहे.
0 Response to " वीस गुंठे शेतात विदेशी पालेभाज्यांची लागवड करून शेतकरी घेत आहे लाखो रुपयांचे उत्पन्न"
टिप्पणी पोस्ट करा