
शिष्यवृत्तीचा अपहार केल्याप्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेसह संस्थेच्या चार जणांवर गुन्हा दाखल
शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३
Comment
BULDHANA : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल मध्ये २०१६ ते २०१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती मध्ये अपहार केल्याची तक्रार दिनेश संगवी यांनी समाज कल्याण विभागाकडे दिली होती. त्यावरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी चौकशी समिती नेमुन चौकशी केली असता, या शिष्यवृत्ती मध्ये ८ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने, चौकशी समिती प्रमुख प्रदीप धर्माधिकारी यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रविणा शहा यांच्यासह संस्थेचे तत्कालीन लेखा लिपिक, संस्था अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष अशा एकूण पाच जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.
0 Response to " शिष्यवृत्तीचा अपहार केल्याप्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेसह संस्थेच्या चार जणांवर गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा