
बुलढाणा जिल्ह्यात लंपीमुळे 5298 जनावरांचा मृत्यू
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३
Comment
BULDHANA : बुलढाणा जिल्ह्यात जनावरांवरील लंपी आजार सध्या आटोक्यात आला असला तरी मात्र आजपर्यंत 53 हजार 723 जनावरे लंपी चर्मरोग आजाराने बाधित झाली असल्याची आकडेवारी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे, यापैकी 48 हजार 419 जनावरे बरी झाली असून 5298 जनावरांचा लंपी मुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे 5151 शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांपैकी 4178 पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यात 10 कोटी 26 लाख 53 हजार 700 रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे, तर उर्वरित पशुपालकांसाठी 2 कोटी 7 लाख 54 हजार 696 रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून निधी प्राप्त होताच या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे.
0 Response to "बुलढाणा जिल्ह्यात लंपीमुळे 5298 जनावरांचा मृत्यू"
टिप्पणी पोस्ट करा