
अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्युटच्या स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन
लोकसवाल न्यूज औरंगाबाद प्रतिनिधि शेख शाहरुख: चिखली बुलढाणा: परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था संचालीत अनुराधा फार्मसी कॉलेजच्या स्नेहसंमेलन दर्पण २०२३ या सोहळ्याचे उदघाटन हरेशभाई शाह, मैनेजींग डायरेक्टर लेबेन लाईफ सायन्स, अकोला आणि परमेश्वरजी बंग अध्यक्ष, जे बि केमिकल्स अॅण्ड फार्मा लि. दमण तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. आ राहुल बोंद्रे यांच्याहस्ते दि. ०९ फेब्रुवारीला संपन्न झाला.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कु रेणुका कुळकर्णी हिच्या नृत्याने झाले याप्रसंगी अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ विश्वनाथ यादव संस्थेचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर वानेरे, संस्थेचे विश्वस्त आत्मराम देशमाने, वर्धमान डहाळे, अतरुदीन काझी, डॉ सत्येंद्र भुसारी, अशोक पहधान, अनुराधा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकी, अनुराधा इंग्लिश मिडियम स्कुलच्या सल्लागार सौ. सुजाता कुल्ली, प्राचार्या सौ नन्हई, अनुराधा नर्सिंगच्या प्राचार्या डॉ मेनका, उपप्राचार्या सोफिया, न.प.चे माजी उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे, तक्षशिला विद्यालयाचे प्राचार्य सुनिल वळसे, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने, अनुराधा बँकेचे संचालक प्रकाश मेहेत्रे, अमित गिनोडे, अॅड प्रशांत देशमुख अनुराधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालाचे प्राचार्य डॉ के आर बियाणी, प्राचार्य डॉ आर एच काळे, प्राचार्य डॉ आर आर पागोरे, प्रा यु एच जोशी, प्रा एस एस कुळकर्णी डॉ सावरकर डॉ सचिन काळे, डॉ गोपाल बिहाणी, डॉ एजाज शेख, महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे प्रभारी डॉ प्रशिक दुधे, डॉ सुषिलकुमार शिंदे व प्रा हसीफ अहमद, प्रा पूजा मिसाळ, पवन लढा तसेच महाविद्यालाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम अनुपेक्स प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यामध्ये पेंटीग, रांगोळी, स्केचेस, फुलांची रांगोळी व विज्ञान मॉडेल्स इत्यादींचा समावेश होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कलेचे सादरीकरण याठिकाणी केले व प्रमुख पाहुण्यांनी या प्रदर्शनीचे विशेष कौतुक केले त्यांनंतर महाविद्यालयाचे डॉ अभयकुमार साखरे, डॉ सुशिलकुमार शिंदे व डॉ भास्कर मोहिते यांनी फार्मसी संबधीत अभ्यासक्रमात पी एच डि संपादन केल्यामुळे त्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्तविकामधुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला त्यानंतर वैक्षणिक प्रगतिच्या आलेखा विषयी अवगत करून दिले. प्राचार्य डॉ आर एच काळे यांनी वर्षभरातील महाविद्यालयाच्या प्रगतीचे अहवाल वाचन केले. त्यानंतर महाविद्यालयीन अनुदर्पण २०२३ मॅगझीनचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले
याप्रसंगी स्व राजेंद्र गिनोडे यांच्या स्मरनार्थ अमित गिनोडे यांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल दिपक उध्दव काळे या विद्यार्थ्यास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख ३१००/- बक्षिस देवुन सन्मानित करण्यात आले त्याच प्रमाणे जी पेंट परीक्षेत विषेष प्राविण्य मिळविल्याबद्दल मनिष तायडे यास रोख ३१००/- बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच स्वराधेश्यामजी बियाणी यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के आर बियाणी यांच्या कडुन फार्माकोलॉजी या विषयात प्रथम येणाऱ्या कु पल्लवी मागुळकर या विद्यार्थ्यांनीस सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख ५१००/- असे बक्षिस देण्यात आले. तसेच महाविद्यालयातुन जी पेंट मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास महाविद्यालयाचे डॉ आशिष गवई यांच्याकडुन ३१००/- बक्षिस वितरित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी हरीषभाई शाह यांनी आपल्या भाषणामध्ये मार्गदर्शनपर भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम आपले चारित्र्य घडवावे असे सांगितले व त्यांच्या आयुष्यातील अनेक गमंतीदार किस्से सांगुन विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविला तसेच वयाच्या १६ व्या वर्षीपासुन त्यांनी केलेल्या कामाचा तपशिल, १८ राज्यामध्ये केलेले कार्य तसेच त्यांच्या विविध संस्थांना मिळालेल्या २४ पुरस्कार विषयी माहीती सांगितली
याप्रसंगी परमेश्वरजी बंग यांनी आपल्या भाषणामध्ये बोलतांना त्यांच्या जिवनातील विविध अनुभव सागितले त्यामध्ये मेहनतीला पर्याय नाही हा एकमेव यषामार्ग त्यांनी सांगितला व भारतीय औषधनिर्मिती उद्योग निर्मिती क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये खुप उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आ राहुल बोंद्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना त्यांनी खेड्यापाड्यातील गोर गरीब जनतेच्या मुला मुलींना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी १९९५ मध्ये चिखली सारख्या शहरात शिक्षणाची दालने खुली करुन दिली व भविष्यात या संस्थांचा आणखी विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विज्ञाना बरोबरच अध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे असे सांगितले. तसेच विद्यापीठातून व जी पेंट मधुन विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाश गायकवाड, सेजल चोपडा, महेश नाठे, रुचिता वानखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. आर आर पागोरे यांनी केले.
0 Response to "अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्युटच्या स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन"
टिप्पणी पोस्ट करा