
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू पुतळ्याचे होणार अनावरण
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - औरंगाबाद, शिंदे गटाचे आमदार संजय राठोड हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावरती आले असता पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या समाधी स्थळाचे विकासासाठी सरकारने 593 कोटी रुपये दिलेले आहे, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली. या निमित्ताने बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराजांच्या पंचधातूचा पुतळा व त्यासोबत दीडशे फूट सेवा दल स्थापन करणार आहोत आणि भूमीपुजन सुद्धा करणार आहोत आणि हे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. आज औरंगाबाद मधल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना संस्था व मंडळ यांच्या आग्रहाखातर औरंगाबाद मध्ये आज आलेलो आहे. आणि आज आम्ही सर्वजण पोहरागडला उपस्थित राहणार असल्याचे नियोजन बैठकीत करण्यात आल्याचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.
0 Response to "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू पुतळ्याचे होणार अनावरण"
टिप्पणी पोस्ट करा