
पोलिसांनी जाणून बुजून हे सर्व घडवून आणलं आणि पोलिसांना हे घडवायचं होतं, अंबादास दानवे यांचा मोठा दावा
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - आदित्य ठाकरे यांनी मिरवणुकीचा आवाज चालू द्या सांगितल्यानंतर सुद्धा पोलिसांनी डीजे बंद केला. त्यामुळे मिरवणुकीतील काही लोकांना राग आला असावा आदित्य ठाकरे यांनी स्वतः सांगून देखील पोलिसांनी डीजेचा आवाज बंद का करायला लावला, ही भूमिका संशयास्पद आहे. त्यानंतर सुद्धा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नाही. त्यामुळे हे सर्व पोलिसांना घडवून आणायचे होते का असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याठिकाणी कोणतेही जबाबदार अधिकारी नव्हते, सुरक्षेचं कोणतंही ज्ञान नसणारे अधिकारी तिथे होते. आम्हीही शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ शकलो असतो. मात्र आमचे नेते असताना ते करणे योग्य नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.
0 Response to "पोलिसांनी जाणून बुजून हे सर्व घडवून आणलं आणि पोलिसांना हे घडवायचं होतं, अंबादास दानवे यांचा मोठा दावा "
टिप्पणी पोस्ट करा