
प्रीयसीला विषपाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३
Comment
WARDHA- वर्ध्याच्या हिंगणघाट येथे औषध पाजून 19 वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही याच गोष्टीचा राग 22 वर्षीय तरुण अमन निखार यांनी मनात धरला. काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडलेल्या तरुणीला रस्तात गाठले आणि आपल्या गाडीवर बसवून निर्जन स्थळी घेऊन जाऊन तरुणाने प्रेयसीला सोबत आणलेले औषध पाजले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान तरुणाने देखील औषध पीत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर त्या दोघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिडीत मुलीची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी माथेफिरू तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्डात राहणाऱ्या आरोपी अमन निखार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगणघाट येथे गेल्या काही वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत कांड प्रकरणामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जातेय. पोलीस देखील तशी खबरदारी घेत आहेत.
0 Response to "प्रीयसीला विषपाजून जीवे मारण्याचा प्रयत्न "
टिप्पणी पोस्ट करा