
चांगल्या भावाच्या अपेक्षेने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस पडून
मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३
Comment
औरंगाबाद: मागील वर्षाच्या तुलनेत सिल्लोड तालुक्यात यंदा जोरदार पाऊस पडला होता. या चांगल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशी ला पसंती देत मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. तालुक्यात यंदा कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात पेरले असून अनेक ठिकाणी कापूस वेचणी सुरू आहे. तालुक्यात ठीक ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशी ची वेचणी करून ठेवली आहे. यंदा चांगला भाव मिळल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्याचा कापसाचा एकूण खर्च ही निघत नसल्याने बाजारात भाव एकदम पडले असल्याने शेतकऱ्यांनी चागल्या भावची अपेक्षा करत चांगला भाव येईल पर्यंत आपला कापूस ठीक ठिकाणी घरात शेतातील बखारीवर कापूस साठवून ठेवला आहे.
0 Response to "चांगल्या भावाच्या अपेक्षेने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस पडून"
टिप्पणी पोस्ट करा