-->
क्रिकेट खेळण्यासाठी जाताना  टेम्पोला धडकल्याने  तरुणाचा मृत्यू

क्रिकेट खेळण्यासाठी जाताना टेम्पोला धडकल्याने तरुणाचा मृत्यू


लोकसवाल न्यूज फुलंब्री  : क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात असताना टेम्पोला पाठीमागून धडकून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान खुलताबाद रस्त्यावर घडली.  अभिषेक रमेश पराशर ( २३ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभिषेक रमेश पराशर हा आपला मित्र ऋषिकेश रत्नाकर जोशी याच्या सोबत आज सायंकाळी खुलताबाद रस्त्यावर देवगिरी कारखाना नजीक असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पोवर ( एमएच २१ बीएच १७१२ )  मोपेड धडकली. टेम्पोच्या पत्रा लागल्याने अभिषेक पराशर गंभीर जखमी झाला. त्याला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेक वेदशास्त्र निपुण होता. क्रिकेट खेळण्याचा छंद असल्याने खुलताबाद मार्गावर असलेल्या मैदानावर तो दररोज मित्रांसोबत सोबत जात असे.  

अभिषेक यांच्या पश्चात आई-वडील, बहिन, आदी परीवार आहे

0 Response to "क्रिकेट खेळण्यासाठी जाताना टेम्पोला धडकल्याने तरुणाचा मृत्यू "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe