
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा विराट मोर्चा
मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३
Comment
AURANGABAD- औरंगाबाद महाराष्ट्रातील शासकीय गायरान गावठाण अथवा वन खाते जमिनीवरील भूमी यांचे 2020 पर्यंतचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी बहुजन सोशॅलिस्ट पार्टीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन आज करण्यात आले होते. हा मोर्चा भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर काढण्यात आला मराठवाड्याचा आर्थिक विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्याच्या आगामी पाच बजेट मध्ये व केंद्रच्या तीन बजेटमध्ये पुरेपूर आर्थिक तरतूद करणे महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुस्लिम यांना शिक्षणातील पाच टक्के आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे व मुस्लिम विद्यार्थ्यांची केंद्रे सरकारने बंद केलेली फ्री मेट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करणे व इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगितले.
0 Response to "बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा विराट मोर्चा"
टिप्पणी पोस्ट करा