
कोरोना : भारतात नवीन व्हेरिअंटचे किती रुग्ण ? वाचा माहिती
महाराष्ट्र : चीनमध्ये कोव्हिड-19 चा सबव्हेरियंट BF.7 च्या संसर्गात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. भारतातही या व्हेरियंटचे 4 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.दरम्यान, देशातील कोरोना स्थिती आणि त्यासंदर्भात यंत्रणेची तयारी यांचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवाय, अनेक राज्यांनीही यासंदर्भात आणीबाणीच्या बैठका बोलावल्या.
कोरोना संदर्भात सगळेच जण सक्रिय झाले आहेत.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं की, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 201 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3397 वर पोहोचली आहे. देशात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण 98.8 % आहे. गेल्या 24 तासांत 183 जण संसर्गानंतर बरे झाले आहेत. देशातीलएकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 41 लाख 42 हजार 791 झाली आहे
0 Response to "कोरोना : भारतात नवीन व्हेरिअंटचे किती रुग्ण ? वाचा माहिती"
टिप्पणी पोस्ट करा