
फुलंब्री पिर बावड़ा येथील फैज़ान मुल्तानी बेपत्ता
लोकसवाल: वैजापूर येथील मदरसेला निघालेला मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. फुलंब्री तालुक्यातील पीर बावडा येथे राहणारा फैज़ान गयास मुल्तानी हे वैजापूर येथील मदरसेला पठणकरिता निघाला होता परंतु तो वैजापूर येथील मदरसेला पोहोचलाच नाही. खुप वेळ गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना समजले की फैज़ान हा बेपत्ता झालेला आहे. फैजानने पांढऱ्या रंगाची शर्ट घातलेले होते. आता नातेवाईक त्याचे शोध करत आहे.
फैज़ानच्या वडिलांनी त्याचे बेपत्ता झाल्याचे तकरार वैजापुर पोलिस स्टेशन येथे केलेली आहे. मिसिंग रिपोर्ट नुसार फैजान हा ३१ ओक्टोबर २०२२ रोजी ०२ वाजे पासून वैजापुर बस स्टैंडहून बेपत्ता असल्याचे सांगितले आहे.
फैज़ान मुल्तानी हा खालीद बिन वलित मदरसा वैजापूर येथे पठण करण्याकरिता जाणार होता तो घरून सकाळी वैजापूर येथे जाण्याकरिता निघाला होता. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. फैज़ान सापडल्यास दिलेल्या नंबर वर सम्पर्क करा अशी मदत नागरिकांशी त्याच्या नातेवाईकांनी मांगितली आहे :-9860688271
0 Response to "फुलंब्री पिर बावड़ा येथील फैज़ान मुल्तानी बेपत्ता"
टिप्पणी पोस्ट करा