
सारथी रिसर्च अँड फेलोशिप विभागाच्या मेल-लिंक मध्ये अखेर दुरुस्ती- अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या प्रयत्नाना यश
७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत लिंक खुली
प्रतिनिधी (पुणे)सारथी या मराठा-मराठा कुणबी वर्गासाठी कार्यरत संस्थेच्या रिसर्च अँड फेलोशिप विभागाच्या मेल-लिंक मधील अनुक्रमांक तीन मध्ये संशोधक विद्यार्थी हितार्थ दुरुस्ती करावी अशी महत्वपुर्ण मागणी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी अशोकजी काकडे-कार्यकारी संचालक,छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था -सारथी पुणे यांचे कडे केली असता संशोधक विद्यार्थी वर्गाचे हीत लक्षात घेता सारथीची कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी तात्काळ दखल घेऊन मागणी केल्या प्रमाणे सदर लिंक ही ज्या विद्यार्थ्यांनी पहिला गुगल फॉर्म भरतेवेळी चूक केली आहे. फक्त अश्या विद्यार्थ्यांनीच लिंक द्वारे माहिती पुन्हा व्यवस्थित भरावी. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी माहिती भरली आहे, त्यांनी ई-मेल दुर्लक्ष करावा. सदर लिंक हि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पर्यंत खुली राहील याची नोंद घ्यावी.उपरोक्त देण्यात आलेल्या दुसऱ्यावे ळेसच्या लिंक वरही आपल्याकडून नजर चुकीने माहिती चुकवली गेली तर तिसरी लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणुन अचूक माहिती नमूद करावे कारणस दर संधी शेवटची-अंतिम आहे याची पुन्हा नोंद घेण्यात यावी अशी माहीती रिसर्च व फेलोशीप विभाग सारथी यांनी दिली आहे.वरील बाबत सर्व संशोधक विद्यार्थी वर्गास त्यांनी सारथीला दिलेल्या इ मेल पत्यावर सविस्तर माहीती सर्व विद्यार्थिनी ग्राह्य धरावी असे आवाहन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.
सारथी संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक अशोक काकडे यांचे विशेष आभार जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले असुन रिसर्च व फेलोशीप विभाग सारथी यांचे सुद्धा आभार व्यक्त करण्यात आले आहे.
अत्यंत महत्वाचे म्हणजे अनुक्रमांक ३ मध्ये नमुद केलेल्या बाबी जाचक असुन सदर लिंक फक्त एकदाच ओपन करता येत असल्यामुळे काळजी पूर्वक अचूक माहीती भरतांना चुका होण्याची किंवा स्लो नेट वर्कींग मुळे माहीती भरतांना लिंक वेळोवेळी उघडणे आवश्यक ठरणार आहे.सध्या लिंक दुसऱ्यांदा उघडत नाही म्हणुन संशोधक विद्यार्थी त्रस्त आहेत.ही महत्वाची व अडचण ठरणारी बाब लक्षात घेता अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी सारथीचे अध्यक्ष निंबाळकर आणि कार्यकारी संचालक अशोक काकडे यांना लेखी निवेदना द्वारे विनंती केली होती हे विशेष होय .
0 Response to "सारथी रिसर्च अँड फेलोशिप विभागाच्या मेल-लिंक मध्ये अखेर दुरुस्ती- अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या प्रयत्नाना यश"
टिप्पणी पोस्ट करा