
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गटाची महायुती?
मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले. त्याआधी अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घ्या, असं आवाहान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.
गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असताना, मनसे आमदार राजू पाटील यांनी 'आमची मनं जुळलेली आहेत. वरून तारा जुळल्या की सर्वकाही जुळून येईल,' असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे ही या नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का? अशी चर्चा सुरू झाली
मुख्यमंत्री शिंदेंनी ही फक्त दिवाळी भेट होती असं म्हणत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी 'हिंदुत्वाच्या मुद्यावर कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत' अशी प्रतिक्रिया दिलीय.
0 Response to "राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गटाची महायुती?"
टिप्पणी पोस्ट करा