-->
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा, कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम असेल, वाचा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा, कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम असेल, वाचा सविस्तर माहिती


औरंगाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि.30 व 31 जुलै, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि.30 जुलै, 2022 रोजी सायंकाळी 06.00 वा. शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन व राखीव. 06.30 वा. शिवसेना पक्षाची जाहीर सभा (स्थळ : महालगांव ता.वैजापूर) रात्री 08.00 वा. वैजापूर येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

रविवार, दि.31 जुलै, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. ते 11.30 वा. पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामे विभागीय आढावा. (स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद). सकाळी  11.30 वा. ते 12.00 वा.  पत्रकार परिषद (स्थळ : औरंगाबाद). दुपारी 12.10 वा. ते 12.30 वा. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषद. (स्थळ : सागर लॉन, जालना रोड, सान्या मोटर्स जवळ, औरंगाबाद). 12.30 वा. औरंगाबाद येथून मोटारीने सिल्लोडकडे प्रयाण. 01.30 वा. ते 02.15 वा. बाळासाहेब ठाकरे चौक लोकार्पण सोहळा (स्थळ : सिल्लोड, जि.औरंगाबाद). 02.30 वा. आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी राखीव. 02.30 वा. ते 02.45 वा. 

1) नगरपालिका इमारतीचे भुमीपूजन 

2) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण. 

3) छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण. 

4) नॅशनल मेडिकल कॉलेज कॉलेज भूमिपूजन

 5) नॅशनल सहकारी सुतगिरणी भूमिपूजन.

 6) फर्दापूर येथे नियोजित छत्रपती शिवाजी व भीम पार्क व्हि.सी. द्वारे भूमिपूजन. (स्थळ : सिल्लोड, जि.औरंगाबाद). 02.45 वा. ते 04.15 वा. शिवसेना पक्षाची जाहीर सभा. (स्थळ : नगर परिषद मैदान). सायंकाळी 04.15 वा. सिल्लोड येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. 06.00 वा. ते 07.30 वा. 1) छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन, औरंगाबाद. 2) अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन, औरंगाबाद. (स्थळ : हर्सूल ते टी.व्ही.सेंटर चौक, हर्सूल नाका, औरंगाबाद) 3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. (स्थळ : भडकल गेट, औरंगाबाद). नारळीबाग येथील संपर्क कार्यालय येथे राखीव. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन (स्थळ : मिलकॉर्नर). सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन. (स्थळ : सावित्रीबाई फुले चौक). वीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन (स्थळ : वीर सावरकर चौक).  07.30 वा. ते 08.00 वा. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. रात्री 08.00 वा. औरंगाबाद येथून मोटारीने समर्थ नगर मार्गे सिल्ले खाना, क्रांती चौक कडे प्रयाण. 08.15 वा. 1) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन 2) शीख समाजाच्या गुरूद्वारास भेट (स्थळ : क्रांती चौक औरंगाबाद). 08.15वा. ते 09.15वा. आमदार संजय शिरसाठ यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 09.15 वा. गारखेडा स्टेडिअम मार्गे आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण. 09.30 वा. ते 09.45 वा. आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 09.45 वा. आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाकडे प्रयाण. 10.10 वा. आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयात आगमन व राखीव. 10.30 वा. आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयातून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. रात्री 11.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0 Response to "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा, कोणत्या ठिकाणी कोणते कार्यक्रम असेल, वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article