
असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल
दिल्ली : प्रक्षोभक वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध FIR नोंदवला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या IFSO Unit नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह नऊ जणांविरुद्ध याच आरोपात FIR नोंदवला होता. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त संदेश पसरवणे, खोट्या आणि पुष्टी नसलेल्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका चर्चेदरम्यान नूपुर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर कथित वादग्रस्त टिप्पणी केली होती. नूपुर शर्माच्या या कथित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली, ज्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. Nupur Sharma तिच्या कथित विधानामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले आणि दिल्ली भाजपाचे मीडिया प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांना वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
0 Response to "असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा