
फुलंब्री येथील आळंद पिंप्री सताळा परिसरात विजेने दोघांची जागीच मृत्यु
फुलंब्री/आळंद पिंप्री सताळा परिसरात पावसाचा बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या दोन जीवलग मित्रांवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१२) दुपारी एक वाजेदरम्यान घडली. यात रोहनसिंग विजयसिंग शिंदे (१५), रवि जनार्दन कळसकर (२१) यांना आपला जीव गमवावा लागला. रोहनसिंग आणि रवी हे दोघे जीवलग मित्र होते,
रोहनसिंग शिंदे, रवि कळसकर हे दोघे रविवारी सकाळी १० वाजेदरम्यान परिसरातील गट १५१ मधील त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी अचानक पावसास सुरुवात झाली. दोघे लिंबाच्या झाडाखाली आश्रयास आले होते; परंतु त्याच झाडावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात
देण्यात आले. गेल्या दोन दिवसात औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भात पंचनामे करण्यात येत आहेत.
0 Response to "फुलंब्री येथील आळंद पिंप्री सताळा परिसरात विजेने दोघांची जागीच मृत्यु"
टिप्पणी पोस्ट करा