-->
प्रत्येक शाळा महाविद्यालयात सीसीटिव्ही कॅमरे आवश्यकच

प्रत्येक शाळा महाविद्यालयात सीसीटिव्ही कॅमरे आवश्यकच


प्रत्येक शाळा महाविद्यालयात सीसीटिव्ही कॅमरे आवश्यकच- राज्य महिला आयोग सदस्या ॲड. संगिता चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 11 : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, वस्तीगृहात सीसीटिव्ही लावणे आवश्यकच आहे. जेणे करुन विद्यार्थ्यांनी, कर्मचारी महिला, या सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, अशा सूचना संबंधित विभागाला राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲङ संगीता चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक विविध विषयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत, सहायक कामगार आयुक्त गजानन बोरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.टी.एस. मोटे यांची उपस्थिती होती.

प्रत्येक शाळा, महाविद्यालय तसेच वस्तीगृहामध्ये पींक बॉक्स त्याचबरोबर विद्यार्थीनींच्या तक्रार निवारणासाठी राज्य महिला आयोगाचा टोल फ्री दुरध्वनी क्रमांक देण्यात येणार आहे. असे सांगून ॲड. चव्हाण म्हणाल्या पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या दक्षता कमिटीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा समावेश करावा जेणे करुन पिडित महिलेला आपल्या समस्या मांडताना अधिक विश्वास निर्माण होईल व ती न घाबरता, निसंकोचपणे तक्रारी सांगू शकतील.

तृतीयपंथीयाना आधारकार्ड, शिधापत्रिकाचे वाटप तात्काळ करावे. शासकीय सवलतीचा लाभ आपल्यासाठी आहे ही भावना निर्माण होईल मूलभूत हक्कापासून तृतीयपंथी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथे देखील त्यांच्यासाठी स्वतंत्र वार्डची निर्मिती करुन खाटा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना देखील ॲड. चव्हाण यांनी संबंधिताना दिल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियासाठी शासनामार्फत दिली जाणारी आर्थिक मदत वाढवून मिळेल यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे ॲड. चव्हाण म्हणाल्या. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रत्येक महिन्यांत महिला दरबार भरवाल्यास दैनंदिन जीवनात महिलांना येणाऱ्या विविध तक्रारीचे निवारण होऊन खऱ्या अर्थाने महिलेला न्याय मिळण्यास मदत होईल. तसेच ॲड. चव्हाण यांनी समुपदेशन गरजू महिलांपर्यत पोहचवण्याकरीता जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.

बैठकीच्या प्रांरभी पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी ग्रामीण भागात महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची PPT द्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना राबवित असलेल्या व प्रत्यक्ष मिळालेली मदत यांची सविस्तर माहिती दिली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची पाहणी यावेळी ॲड. चव्हाण यांनी केली.

0 Response to "प्रत्येक शाळा महाविद्यालयात सीसीटिव्ही कॅमरे आवश्यकच"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe