-->
बिल्डा फाटा परिसरात झालेल्या ST बस व दुचाकी अपघात, दचाकीस्वार ठार

बिल्डा फाटा परिसरात झालेल्या ST बस व दुचाकी अपघात, दचाकीस्वार ठार

फुलंब्री : बोदवड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा भरधाव एस. टी. बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फुलंब्री तालुक्यातील बिल्डा फाटा परिसरात घडली. औरंगाबादहून मलकापूरला जाणारी एस. टी. बस (क्र. एम. एच. ४० / वाय. ५०४६) आणि फुलंब्रीकडून औरंगाबादला जाणारी मोटारसायकल (क्र. एम. एच ३/ए. पी. ३६७०) यांची औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा परिसरातील दर्गासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार शेख इकबाल शेख कदीर कुरेशी (वय ७० वर्षे, रा. बोदवड, जि. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. शेख इकबाल यांची दुचाकी एस.टी. बसच्या पुढील चाकाखाली चिरडली गेली व त्यात ते जागीच ठार झाले. मृत शेख इकबाल यांना फुलंब्री येथील रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

0 Response to "बिल्डा फाटा परिसरात झालेल्या ST बस व दुचाकी अपघात, दचाकीस्वार ठार"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe