
महाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
Comment
गुडी पडवा आणि रमजान येण्यापूर्वी सरकार ने एक मोठे पाउल उचलले आहे. एप्रिलपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध हाटवण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पण, याचा अर्थ आता एकदम बिनधास्तपणे वावरावं असा होत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा. मास्क वापरणं ऐच्छिक असेल असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मास्क लावला नाही तर आकारण्यात येणारा दंड आता रद्द करण्यात आहे. यामुळे आता गुढीपाडवा, रमजानचा महिना आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उत्साहानं साजरा करू शकणार आहोत, असं टोपे म्हणाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, "आज मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.
0 Response to "महाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार"
टिप्पणी पोस्ट करा