-->
 महराष्ट्र अधिवेशनाचा पहिल्याच दिवस, भाजपचा आक्रमक पवित्रा, मंत्री नवाब मालिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

महराष्ट्र अधिवेशनाचा पहिल्याच दिवस, भाजपचा आक्रमक पवित्रा, मंत्री नवाब मालिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : नवाब मलिक यांचे अ‍ॅडरवल्ड डॉन यांच्याशी कनेक्शन असल्याचे भाजपने आरोप केले आहे आणि त्या प्रकरणावर ते ईडीच्या रडारवर आले. महाराष्ट्रात आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पाहायला मिळाली.

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आज पासून सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी भाजप आमदारांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. नंतर विधिमंडळाच्या बाहेर भाजप आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे घोषणा दिले आहे.  राज्यसरकारनं दरवर्षी नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतलं. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येईल असं सांगीतले आहे. आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपच्या आमदारांना जोरदार घोषणाबाजी सुध्दा केली.


0 Response to " महराष्ट्र अधिवेशनाचा पहिल्याच दिवस, भाजपचा आक्रमक पवित्रा, मंत्री नवाब मालिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe