-->
विना आरक्षण निवडणूक झाल्या तर मतदानावर बहिष्कार टाकणार,  नॉन पॉलिटिकल ओबीसी सोशल फ्रंट चा मुख्यमंञी यांना निवेदन

विना आरक्षण निवडणूक झाल्या तर मतदानावर बहिष्कार टाकणार, नॉन पॉलिटिकल ओबीसी सोशल फ्रंट चा मुख्यमंञी यांना निवेदन

 

औरंगाबाद (प्रतिनिधी आदिल खान ) :- आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक विना ओबीसी राजकीय आरक्षण निवडणूक झाल्या तर आम्ही बहिष्कार टाकणार असे नारे देत नॉन पोलिटिकल ओबीसी सोशल फ्रंट च्या वतीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोग व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ञिसूत्राचा तात्काळ अवलंबण करण्यात यावा,समर्पित आयोग नेमावा,ओबीसी मधील जातीने छाननी करून इम्पीरियल डेटा सादर करावे.

इम्पीरियल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला भरीव निधी देण्यात यावा, राजकीय व्यक्तींची आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती करू नये,ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्यात येऊ नये अन्यथा ओबीसी समाज निवडणुकीत बहिष्कार करेल.

अशा विविध मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व निवडणूक आयोगाला सं.सो. खंडाळकर,रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले,विना ओबीसी आरक्षण निवडणुका घेतल्या तर आम्ही मतदानावर बहिष्कार करू असे नारे देत विभागीय आयुक्तांना स.सो.खंडाळकर, अंबादास रगडे,रोहिदास पवार,महादेव आंधळे,सौ.सरस्वती हरकळ,सौ.कांचन सदाशिवे,वसंत वक्ते,पंडीत तुपे ९)रमेशचंद्र धनेगावकर,विष्णू वखरे,महेश निनाळे,महादेव डांबरे,मिर्झा अब्दुल,एस एस कुुंडकर,यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले,

0 Response to "विना आरक्षण निवडणूक झाल्या तर मतदानावर बहिष्कार टाकणार, नॉन पॉलिटिकल ओबीसी सोशल फ्रंट चा मुख्यमंञी यांना निवेदन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe