-->
नागरिकांची लुट ? नविन कनेक्शनची रक्कम तीन पट, गब्बर एक्शन संघटनेने दिला महावितरणला निवेदन

नागरिकांची लुट ? नविन कनेक्शनची रक्कम तीन पट, गब्बर एक्शन संघटनेने दिला महावितरणला निवेदन

औरंगाबाद (प्रतिनिधी ) गब्बर अॅक्शन कमिटी तर्फे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता होशियार सिंह राजपुत यांना  देण्यात आले आहे, नविन विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केले असता सीआरए ची रक्कम कोटेशन मध्ये तिप्पट टाकण्यात येत आहे. सदरील सर्विस  वायर ग्राहक त्यांच्या स्वखर्चाने आणत असुन आपल्या कार्यालयाकडुन दिलेले सीआरएचे ची रक्कम मार्केट मधील सीआरए पेक्षा तिप्पट आहे. आपल्या कार्यालयाकडुन कोटेशनवर दिलेले सीआरए मुळे गरीब व अशिक्षीत जनताचे हाल होत आहे. रद्द करण्यात यावे या म्हणुन महावितरण कार्यालयाकडुन लोकांना दिलेले सीआरए यासाठी ज्या-ज्या ग्राहकांकडुन रक्कम आकारण्यात आली आहे त्यांना ती रक्कम परत करण्यात आली आहे.

तसेच आपल्याकडुन विद्युत मिटर बिल भरण्याकरीता येणाऱ्या ग्राहकांकडुन ५००० रुपये इतकी रक्कम नगदी रोख घेतली जात आहे परंतु ग्राहकांचे विद्युत बिल ५००० पेक्षा जास्त असल्यास व त्याच्याकडे नगदी रोख रक्कम असल्यास त्या ग्राहकास नगदी रक्कम बिल भरण्यास नकार दिला जातो व त्या ग्राहकांला दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात आहे. तसेच ग्राहकांकडुन विद्युत बिल भरण्याकरीता धनादेश दिले जात असेल तर ते धनादेश नकारले जात आहे. नविन विद्युत कनेक्शनसाठी नविन कोटेशन करीता सुध्दा इकडे-तिकड़े भरण्यास पाठविले जात आहे.  महावितरणचा काऊंटर वर १,००,०००/- अक्षरी एक लाख रुपये इतकी रक्कम विद्युत कनेक्शन बिल भरण्याकरीता घेण्यात यावे व ग्राहकांचे धनादेश स्वीकारण्यात यावे कोटेशनसाठी सुध्दा ग्राहकाला नगदी रोख रक्कम भरण्यास नकार देण्यात येऊ नये करीता निवेदन सादर.

गब्बर अॕक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसुद अन्सारी,शेख हनिफ बब्बू नगरसेवक, हफिज अली,इम्रान पठाण,हसन शाह जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष,सोशल विलास मगरे,समद बागबान,तय्यब जफर प्रवक्ता, काझी शकील, मोहसिन शेख लक्की आदींचे स्वक्षरी आहे.

0 Response to "नागरिकांची लुट ? नविन कनेक्शनची रक्कम तीन पट, गब्बर एक्शन संघटनेने दिला महावितरणला निवेदन "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe