-->
 औरंगाबाद : कुरीअर पार्सलने आलेली ३७ तलवारी आणि १ कुकरी जब्त, क्रांतीचौक पोलिसांची मोठी कार्यवाही

औरंगाबाद : कुरीअर पार्सलने आलेली ३७ तलवारी आणि १ कुकरी जब्त, क्रांतीचौक पोलिसांची मोठी कार्यवाही


औरंगाबाद : औरंगाबाद  पोलिसांनी आज एक मोठी कार्यवाही केली आहे. क्रांतीचौक पोलिस ठाणे येथील पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जब्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डीटीडीसी कुरीअरने हा मोठा शस्त्रसाठा निघाला आहे. कुरीअर कोणी पावठवे आणि कोणाकडे जात होते याचा तपास सुरु आहे. 

या पार्सल मध्ये तब्बल ३७ तलवारी आणि १ कुकरी मिळाल्याची माहिती आहे. औरंगाबाद पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्या माहितीवरुन हि संपुर्ण कार्यवाही क्रांतचोक पोलिसांनी केलेली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत कुरिअरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथील व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड यास माहिती विचारली असता, असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.

0 Response to " औरंगाबाद : कुरीअर पार्सलने आलेली ३७ तलवारी आणि १ कुकरी जब्त, क्रांतीचौक पोलिसांची मोठी कार्यवाही"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article