-->
ओरीऑन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

ओरीऑन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

 

औरंगाबाद, दि.8 ओरीऑन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड रोग व मूत्ररोग विभागातील तज्ञ डॉक्टर यांनी 24 जानेवारी रोजी रुग्णालयात पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 40 वर्षीय निफाड तालुक्यातील तरुणावर पार पडली. यामध्ये त्याच्या आईने त्याला आपले एक मूत्रपिंड दान करुन जीवदान दिले. ही जटिल व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ओरीऑन हॉस्पिटलच्या टीमने पार पाडली अशी माहिती पत्रकार परिषदेत किडनी ट्रान्सप्लांट तज्ञ डॉ. श्रीगणेश बर्नेला यांनी दिली आहे.

आज हा रुग्ण सर्व सामान्य व्यक्तिसारखे जीवन जगत असून तो आज डायलिसिस पासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. हि शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट तज्ञ डॉ. श्रगणेश बर्नेला, डॉ. प्रदीप सारुक, डॉ. शरद सोमाणी, डॉ. अरुण चिंचोले, डॉ. सुदर्शन जाधव, भूलतज्ञ डॉ. भूषण मोहरीर, डॉ. संजय इथापे, डॉ. मंगलमूर्ती चौधरी यांनी यशस्वी पार पाडली. अवयव प्रत्यारोपण समन्वयक अमोल मुदलियार यांनी काम पाहिले. यावेळेस रुग्णालयाचे सिएमडी डॉ. आशिष देशपांडे तसेच सिईओ डॉ. विरेंद्र वडगावकर, व डॉक्टर, कर्मचारी यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण टिमचे अभिनंदन केले. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. सर्व गरजू रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.

0 Response to "ओरीऑन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe