-->
औरंगाबाद: जहांगीर कॉलोनी हर्सुल येथे राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न

औरंगाबाद: जहांगीर कॉलोनी हर्सुल येथे राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न

लोकसवाल प्रतिनिधी :- औरंगाबाद जहांगीर कॉलोनी हर्सुल वार्ड नंबर ३,४ या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षांमध्ये शेकडोंच्या संख्येने औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आले.

प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सय्यद सत्तार यांनी जावेद नवाज खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष खाजा शरफोद्दीन यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांशी राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्‍ला यांनी चर्चा करून वार्ड क्रं.३,४ समस्या जाणून घेतल्या तसेच वार्डात अनेक गल्ली मध्ये जाऊन वार्ड ची पाहणी केली. वार्डातील होणाऱ्या  समस्या लोकांकडून जाणून घेऊन लोकांना होणारा त्रास व समस्यांचे लवकरात लवकर प्रश्न सोडण्याचा आश्वासन या ठिकाणी खाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या वतीने देण्यात आले.

या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख मान्यवर शहर उपाध्यक्ष मोहम्मद हबीब ( मुन्नाभाई), तय्यब खान,  शेख नवाज, अनवर नवाब, अजमत भाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश कर्ता यांची यादी

सय्यद सत्तार, सय्यद मोहसीन, सय्यद गफ्फार, शेख अफसर, शेख अलबक्श, डॉक्टर शाह, जावेद भाई, रहीम खान, शेख अफरोज, शेख कलीम, अब्दुल हाफिज, वाजिद भाई, माजीद भाई, सय्यद कलीम, खालेद भाई, साजेद भाई, सैफ खान, अबेद शाह, तौफीक शेख, शेख अख्तर इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षांमध्ये प्रवेश केला.

0 Response to "औरंगाबाद: जहांगीर कॉलोनी हर्सुल येथे राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe