-->
औरंगाबाद शहरात झडकले "घरकुल" नाही "फेककुल" योजनेचे बॅनर, MIM चा मोदी सरकार वर हल्लाबोल

औरंगाबाद शहरात झडकले "घरकुल" नाही "फेककुल" योजनेचे बॅनर, MIM चा मोदी सरकार वर हल्लाबोल

 

औरंगाबाद : सपनो का घर सपने में ही मिलेगा ! असे एमआयएम ने मुख्य चौकात बॅनर लावले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार यांनी लोकसभेत घरकुलचा मुद्दा उचलला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितले की अनेक लोकांना घरकुल साठी फक्त स्वप्न दाखवले गेले आहे. त्यांना त्यांच्या स्वप्नाचे घर अद्याप मिळालेला नाही.

मोदी सरकारने सन 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे आश्वासन दिले होते परंतु घरकुल योजने अंतर्गत असे काहीही झालेले नाही असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज़ जलील यांनी लोकसभेत म्हंटले आहे. मोदी सरकार वर हल्लाबोल करत AIMIM पक्षाच्या वतीने शहरात घरकुल एवजी फेकफुल योजनेचे बॅनर लावण्यात आलेले आहे. हर्सूल टी पॉइंट, कलेक्टर ऑफिस सर्कल, रोशन गेट, दमडी महल, भडकल गेट, सिटी क्लब सर्कल (आमखास मैदान समोर) या ठिकाणी झडकले बॅनर.

शहरात अनेक ठिकाणी असे बैनर लावले आहे.


0 Response to "औरंगाबाद शहरात झडकले "घरकुल" नाही "फेककुल" योजनेचे बॅनर, MIM चा मोदी सरकार वर हल्लाबोल"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe