-->
लातूर : चंद्रकांत केंगार यांचा कासार सिरसीत सत्कार, केंद्रीय पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती

लातूर : चंद्रकांत केंगार यांचा कासार सिरसीत सत्कार, केंद्रीय पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती

कासार सिरसी येथील अल्पसंख्याक समाजातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विचारसरणीचे चंद्रकांत केंगार यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली त्या प्रित्यर्थ शहर पत्रकार संघ व मित्र परिवार यांच्यावतीने उपसरपंच बडे साहेब लकड हरे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले

मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून समाज व पत्रकारात गोडवा निर्माण व्हावा या हेतूने आयोजिण्यात आलेल्या या समारंभास ज्येष्ठ पत्रकार श्याम मूळजकर ज्ञानेश्वर मडोळे संतोष डांगे यांचेसह अहमद अतार बबलू सौदागर आप्पासाहेब मुळजे सोम शालगर गणेश यादव संजीव यादव नारायण डोंबाळे तम्मा बोळशेट्टे उद्धव माने महेश शाबादे आदी मान्यवर उपस्थित होते

चंद्रकांत केंगार यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रावर केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप का

सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कमलेश गायकवाड साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मोरे विनायक कंगणे यांच्यासह कार्यकारणीच्या ठरावानुसार सदर नियुक्ती देण्यात आली असल्याचे नमूद केले असून त्या्वर सर्वांच्या स्वाक्षर्‍या आहेत

सत्काराला उत्तर देताना अंगारे म्हणाली की पत्रकारितेच्या क्षेत्रात मी ज्येष्ठ पत्रकार मुळजकर यांचेकडून प्रेरणा घेतली असे सांगून ते म्हणाले की यापुढील काळात मी सबंध जिल्ह्यात ही संघटना मजबूत करण्याचे कार्य करीन असे आश्वासन दिले त्यांच्या कार्यास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

0 Response to "लातूर : चंद्रकांत केंगार यांचा कासार सिरसीत सत्कार, केंद्रीय पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe