-->
निवडणूक उमीदवारीसाठी बायको पाहिजे प्रकरणात क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

निवडणूक उमीदवारीसाठी बायको पाहिजे प्रकरणात क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

 

औरंगाबाद : सध्या औरंगाबाद मध्ये एका बॅनरची चर्चा सुरू झालेली आहे आणि तो बॅनर औरंगाबादच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावलेला आहे. हा बॅनर लावणारा व्यक्ती रमेश पाटील असे त्याचे नाव आहे.

निवडणुकीसाठी बायको पाहिजे असे बॅनर लावताच सोशल मीडियावर बॅनर ची चर्चा सुरु झाली आणि हा बॅनर मराठवाड्यात सोशल मीडियातून व्हायरल झाला. परंतु हे बॅनर लावणे पाटील यांना भोवले आहे, कारण त्यांच्या विरुद्ध क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बॅनरला भाजपचे महिला गाडीने तीव्र विरोध केलेला आहे. सध्या क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे महानगरपालिकाच्या वतीने अनधिकृतपणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

0 Response to "निवडणूक उमीदवारीसाठी बायको पाहिजे प्रकरणात क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article