-->
औरंगाबाद : ओमायक्रॉन बाबत कोविड टास्क फोर्सची बैठक, जिल्हाधिकारी पासून मनपा आयुक्त शामिल

औरंगाबाद : ओमायक्रॉन बाबत कोविड टास्क फोर्सची बैठक, जिल्हाधिकारी पासून मनपा आयुक्त शामिल

औरंगाबाद, : ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच 15 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी (फ्रंटवर्कर) यांच्या 03 जानेवारीपासून 2022 सुरू होणाऱ्या लसीरकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा,तसेच जिल्हा टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य, विभागप्रमूख यांच्यासह घाटी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिकेतील आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनूसार जिल्ह्यात 3 जानेवारीपासून 15 वर्षे पूर्ण झालेल्या मूलांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने करावे. यामध्ये ‘हर घर दस्तक’ प्रमाणेच ‘हर स्कूल/कॉलेज दस्तक’ या उपक्रमांतून मूलांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लसीरकणासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी दिले.

ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात विना मास्क फिरणाऱ्या एकूण 325 वाहनधारकांना परिवहन विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून 1 हजार 180 विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांचे फोटो महानगरपालिकेकडून कारवाईसाठी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. ह्या वाहन धारकाच्या वाहनांच हस्तांतरणही बंद करण्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून हॉटेल व रेस्टारंट क्षमतेच्या 50 टक्के तसेच लग्न समारंभ येथे 100 व्यक्ती उपस्थित राहू शकतात याबाबत दि.25 डिसेंबर रोजी टास्क् फोर्स समितीने जो निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे सर्व नियमावली जिल्ह्यासाठी लागू असणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.नियमावली:-

1)विवाहाच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची गर्दी एकाच ठिकाणी जास्त होते, तेथे एकावेळी उपस्थितांची एकूण संख्या, बंदिस्त जागांसाठी 100 पेक्षा जास्त नसावी (जसे की मेजवानी/मॅरेज हॉल इ.) आणि मोकळ्या जागेसाठी (open to sky) 250 किंवा अशा जागांच्या क्षमतेच्या 25% , यापैकी जे कमी असेल ते.

2) इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती सामान्यतः संपूर्ण कार्यक्रमात कायम असते, तेथे उपस्थितांची एकूण संख्या देखील बंद जागेसाठी(सामुहिक भोजन व्यवस्था असलेले हॉल(Banquet) /मॅरेज हॉल 100 आणि मोकळ्या/खुल्या जागेसाठी (open to sky) 250 किंवा 25% पेक्षा जास्त नसावी. अशा जागांची क्षमता, जे कमी असेल.

3) वर नमूद केलेल्या श्रेण्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कार्यांच्या बाबतीत, बंद जागांसाठी उपस्थितांची एकूण संख्या परवाना देणा-या/परवानगी देणा-या प्राधिकरणाने घोषित केलेल्या क्षमतेच्या 50% पेक्षा जास्त नसावी ज्यामध्ये बसण्याची जागा निश्चित(Fixed) आणि स्थावर व आवश्यकते प्रमाणे एका जागेवरून दुसरीकडे न हलवता येणारी (Immovable) आहे आणि क्षमतेच्या 25% ज्यामध्ये जागा निश्चित नाहीत.अशा मोकळ्या / खुल्या जागेसाठी (open to sky) परवाना देणा-या / परवानगी देणा-या प्राधिकरणाने घोषित केलेल्या क्षमतेच्या २५% पेक्षा जास्त नसावी.

4) क्रीडा कार्यक्रम/स्पर्धांच्या आयोजनाच्या बाबतीत, प्रेक्षक संख्येची उपस्थिती आयोजन स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५% पेक्षा जास्त नसावी.

5) इतर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रम/मेळाव्याच्या बाबतीत, जे उपरोक्त सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही श्रेणीमध्ये येत नाही, तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे संदर्भ क्र.16 वरील आदेशा अंतर्गत दिलेल्या टक्केवारीच्या मर्यादेचा भंग न करता, अशा मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येची कमाल मर्यादा ठरवेल.

6) वरील दिशानिर्देशांच्या व्यापकतेचा पूर्वग्रह न ठेवता, हे स्पष्ट करण्यात येते की रेस्टॉरंट्स, जिम्नॅशियम, स्पा, सिनेमा हॉल आणि थिएटर्स परवाना देणा-या / परवानगी देणा-या प्राधिकरणाने घोषित केल्यानुसार क्षमतेच्या 50% वर कार्यरत राहतील. या आस्थापनांनी त्यांचे परवाना/परवानगी असलेल्या क्षमतेच्या 50% परवानगीनुसार त्यांची पूर्ण क्षमता ठळकपणे घोषित करावी.

7) जिल्ह्याभरात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.

8) या निर्देशांतर्गत स्पष्टपणे अंतर्भूत नसलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या बाबतीत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सामान्यत: या तत्त्वांचे पालन करून किंवा स्थानिक परिस्थितीच्या आधारावर, योग्य वाटल्यास, योग्य निर्बंध ठरवू शकते. अशा परिस्थितीत, असे निर्बंध लागू करण्यापूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुरेशी सार्वजनिक सूचना देईल.

9) या आदेशामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या बाबतीत, विशिष्ट स्थानिक परिस्थितीमुळे कठोर निर्बंध आवश्यक आहेत असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे मत असल्यास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण येथे समाविष्ट असलेल्या आणि त्यावरील निर्बंधांवर असे कठोर निर्बंध लागू करू शकते. अशा परिस्थितीत, असे कठोर निर्बंध लागू करण्यापूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुरेशी सार्वजनिक सूचना देईल.

10)या आदेशात विशेषत: नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर सर्व विद्यमान निर्बंध संदर्भ क्र.16 व 18 अंतर्गत आदेशानुसार लागू राहतील.

11)हा आदेश दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 00:00 वाजल्यापासून लागू होईल.याबरोबच उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.

मास्क वापरणे, 2 गज दुरी (6 फुट अंतर) आणि सॅनीटायझरचा वापर आवश्यकते नुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य आहे असे सुनील चव्हाण जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबादच्या आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.

0 Response to "औरंगाबाद : ओमायक्रॉन बाबत कोविड टास्क फोर्सची बैठक, जिल्हाधिकारी पासून मनपा आयुक्त शामिल"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe