-->
औरंगबाद मध्ये राजकीय पक्ष नव्हे तर, जिल्हा कलेक्टर आणि मनपा आयुक्तांनी काढली रैली-वाचा सविस्तर माहिती

औरंगबाद मध्ये राजकीय पक्ष नव्हे तर, जिल्हा कलेक्टर आणि मनपा आयुक्तांनी काढली रैली-वाचा सविस्तर माहिती

 “कोरोना हारेगा देश जितेगा” लसीकरणाबाबत जनजागृती; जिल्हा प्रशासनाची रॅली


औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण जाणीव जागृती रॅलीचे आयोजन केले. यावेळी, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.या रॅलीस शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयापासून  सुरुवात झाली.तेथून चिश्तीया चौक पर्यंत ही रॅली काढण्यात आली.


औरंगाबाद जिल्ह्याचे एक महिन्यापूर्वी लसीरकणारचे प्रमाण अल्प होते, याच पार्श्वभूमीवर मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्या बाबतच्या सूचना केल्या होत्या, याचाच भाग म्हणून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी विविध उपक्रम राबवून एक महिन्यात लसीरकणाचे प्रमाण  78 %  पर्यंत नेले आहे. यात सर्व प्रशासनाचे काम व नागरिकांच्या सहकार्य यामुळे हे यश साध्य झाले असून अजून 22 टक्के लसीकरणाचा टप्पा पूर्ण करुन 100% लसवंत करण्यासाठी आज या रॅलीच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना आवाहन केले.

या लसीरकरण जाणीव जागृती  रॅलीत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व स्वयंस्फूर्तीने नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.

0 Response to "औरंगबाद मध्ये राजकीय पक्ष नव्हे तर, जिल्हा कलेक्टर आणि मनपा आयुक्तांनी काढली रैली-वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe