-->
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी  आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची निवड

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची निवड

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी नामांकन भरले होते या नामांकनाचे श्री. शेख हसनैन शाकीर हे सूचक  होते. तर यास अनुमोदन श्री. समीर गुलामनबी काझी यांनी केले.

या निवडणुकीत अन्य कोणीही अध्यक्षपदासाठी नामांकन न भरल्याने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची अध्यक्षपदासाठीची ही निवडणूक बिनविरोध झाली व आ. डॉ. वजाहत मिर्झा यांना बिनविरोध महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती जयश्री मुखर्जी, अप्पर मुख्य सचिव, अल्पसंख्यांक विभाग तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.

0 Response to "महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची निवड"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article