-->
ज्योतीषाचार्य अतुल छाजेड करणार न्यायालयासमोर आमरण उपोषण...?

ज्योतीषाचार्य अतुल छाजेड करणार न्यायालयासमोर आमरण उपोषण...?

देशभर सुरु केले पोटगी बंद आंदोलन...

औरंगाबाद (आदिल खान प्रतिनिधि) न्यायालयात येणाऱ्या 90 टक्के केसेसमध्ये पुरुषांची फसवणूक करुन महीलांकडून बोगस केसेस करणा-यांची संख्या वाढत आहे. यामुळे पुरुष माणसिक तणावाखाली जात आहे. सर्वच महिला तशा नाही पण काही केसेसचा अभ्यास केले असता पुरुषांना पोटगी भरावी लागते संबंधित महिला नोकरी करत असताना सुध्दा पोटगी भरण्यासाठी न्यायालयाचे चक्कर काटावे लागतात असा अजब दावा पत्रकार परिषदेत ज्योतीषाचार्य अतुल छाजेड यांनी केला आहे.

एका केसमध्ये कोपरगाव न्यायालयात संदीप धनवटे यांच्यावर अन्याय झाल्याने उद्यापासून  मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. एका न्यायाधिशाने या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची कॉपी फाडून फेका असे म्हटले म्हणून न्यायालयाचे अवमान झाले म्हणून कार्यवाई करण्याची मागणी आहे. यासाठी आमरण उपोषण करणार आहे असे स्पष्ट केले. कार्यवाईसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, प्रमुख न्यायाधिश, अहमदनगर, प्रमुख न्यायाधिश कोपरगाव, संबंधित न्यायाधीश यांना पत्र पाठवले आहे.

0 Response to "ज्योतीषाचार्य अतुल छाजेड करणार न्यायालयासमोर आमरण उपोषण...?"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe