-->
मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल ! ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी

मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल ! ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी


 (प्रतिनिधी)- ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात ८०० ते १०००चौ.फु.पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायम स्वरूपी मालमत्ता करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास तात्काळ द्यावेत अशी मागणी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे सविस्तर निवेदन देऊन केली असता मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गांभिर्या ने घेत पुढील कार्यवाही साठी सदर निवेदन आता नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांचे कडे पाठवले असल्यामुळे शहरातील सिडको- हडको,जुने शहर,नियमीत होणारा गुंठेवारी भाग,शहरा लागतचा नव्याने विकसीत होणारे रहिवाशी क्षेत्र व छोटे छोटे फ्लॅट्सचे मालक या सह लाखो मालमत्ता धारकांना याचा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे दिलेल्या सविस्तर निवेदनात शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केले की, नुकतेच  ठाणे  महापालीकेच्या वतीने  ५०० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला व सत्ताधारी शिवसेनेसह ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वानुमते या ठरावाला मंजुरी दिली.प्रशासना कडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून त्यांस मंजुरी घेऊन त्यानंतर त्याची अंमल बजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद साठी या कर माफी मुळे महापालीके च्या उत्पन्नावर  परिणाम होण्याची शक्यता जरी असली तरी आता औरंगाबाद शहराची निवड" यास्मार्ट सिटी प्रकल्पात " झालेली असल्यामुळे इतर स्रोता मुळे उत्पन्नात मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे. औरंगाबाद महानगरपालीका क्षेत्रात सुद्धा वरील प्रमाणे  जनहितार्थ कायम स्वरूपी निर्णय घेणे साठी प्रशासक मनपा औरंगाबाद यांना सुद्धा निर्देशीत करावे आणि तसा सकारात्मक ठराव शासना कडे पाठवण्याचे निर्देश व्हावेत ही विनंती देखील राजेंद्र दाते पाटील यांनी करतांना विशेष बाब नमुद केली की,करोना प्रादुर्भाव काळामुळे औरंगाबादकरांना मोठ्या आर्थीक संकटास सामोरे जावे लागत असुन शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी ८०० ते १००० वर्ग फुट मालमत्तां धारकांना कायमस्वरूपी करमाफी ठराव प्रशासक, मनपा औरंगाबाद यांनी शासनास सादर करावा म्हणुन तसे निर्देश होणे गरजेचे आहे.

ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात ८०० ते १००० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना व मालमत्ताना करमाफी कायम स्वरूपी देण्याच निर्देश नगरविकास विभागास होणे आणि त्या अनुषंगाने प्रशासक-मनपा औरंगाबाद यांनी मागणी प्रमाणे मंजुरी घेणे बाबतचा ठराव राज्य शासना कडे पाठविण्याचे तात्काळ जनहितार्थ आदेश व्हावेत ही महत्व पुर्ण मागणी करण्यात आली आहे. 

0 Response to "मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल ! ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe