-->
लस घेतली नसेल तर पेट्रोल, गॅस, राशन मिळणार नाही- औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लस घेतली नसेल तर पेट्रोल, गॅस, राशन मिळणार नाही- औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद : कोरोना ची तिसरी लाटांची भीती समोर आहे आणि त्यात औरंगाबाद शहरात व जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण अल्प आहे त्या कारणाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे की ज्या नागरिकांनी लसीचे पहिले डोस घेतलेले नाही त्यांना पेट्रोल मिळणार नाही तसेच घरासाठी वापरण्यात येणारे गॅस मिळणार नाही आणि अन्य धान्य सुद्धा मिळणार नाही

या आदेशाची अंमलबजावणी दहा तारखेपासून करण्यात येणार आहे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे जेणेकरून लसीकरण घ्यावे गंभीर का निर्माण होणार म्हणून जिल्हाधिकारी यांनी हा देश दिलेला आहे जर तुम्हाला पेट्रोल गॅस आणि अन्नधान्य हवे असेल तर औरंगाबाद नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक आहे यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु नागरिकांनी प्रशासनाला लसीकरणासाठी मदत करावी असे सांगण्यात येत आहे.

वाचा औरंगाबाद जिहाधिकारी यांचे सविस्तार आदेश :

पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

 जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश जारी केले असून त्यांची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी या आदेशाचे पालन करण्याबाबत खालील मार्गदर्शक सूचना आज दि.09 नोव्हेंबर पासून निर्गमित केल्या आहेत.

 कोविड-19 विषाणूच्यार संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यालचे पार्श्व भूमीवर दि.31. ऑक्टोबर 2021 रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दूरचित्रवाणीद्वारे (VC) सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून, राज्यामध्ये लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा हा 26 व्या क्रमांकावर गेला आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केलेले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन Covid-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येईल.  

शेतकऱ्यांचा माल स्विकृत करण्यात यावा व लिलावाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कृषी मालाचे देयके अदा करणेपुर्वी लस प्रमाणपत्राबाबत खात्री करावी. तसेच पेट्रोल पंपावर बाहेरील जिल्हयातील व्यक्तिंची यादी करावी व लसीकरण प्रमाणपत्राबत विचारणा करावी. प्रमाणपत्र नसल्यास नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करणे बाबत सूचित करावे. सदर आदेश औरंगाबाद जिल्हयासाठी खालील यादी करीता पुढील आदेशापर्यंत  निर्बंध लागू करण्यात येत आहेत.सर्व पेट्रोल पंप धारक, 2. सर्व गॅस एजन्सी धारक, 3. सर्व रास्त भाव दुकानदार, 4. कृषि उत्पन्न बाजार समित्या  सदर आदेशाची अंमलबजावणी दि.10 नोव्हेंबर, 2021 चे सकाळी सुर्योदया पासून  ते  पुढील आदेशापर्यंत लागू राहील.उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे. मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3) सॅनीटायझर 4) आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे,100% लसीकरण (प्रथम मात्रा : First Dose) झाले  पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield -84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांकडे  “ हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतीशत लसीकरण वार्ड” या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोस साठी  पाठपुरावा करावा. Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करु शकतील. सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. सदरील आदेश दिनांक 09 नोव्हेंबर, 2021 रोजी निर्गमित करण्यात येत आहेत.


पहा वीडियो: लेबर कॉलोनी येथे अंबादास दानवे व हिशाम उस्मानी यांच्या चर्चातुन मार्ग निघाला नाही 

0 Response to "लस घेतली नसेल तर पेट्रोल, गॅस, राशन मिळणार नाही- औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe