-->
औरंगाबाद : लेबर कॉलनी येथील जीर्ण झालेल्या इमारती पाडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक

औरंगाबाद : लेबर कॉलनी येथील जीर्ण झालेल्या इमारती पाडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक



औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विश्वासनगर लेबर कॉलनी येथील शासकीय निवासी इमारती जीर्ण झाल्याने त्या पाडण्यासाठी विविध पथकांची  नेमणूक केली आहे.  या पथकांनी करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत लवकरच आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या आढावा बैठकीत सांगितले.

या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंदार वैद्य, पोलीस उपाधिक्षक उज्जवला बनकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नेमण्यात आलेले पथक पुढील प्रमाणे. 

अनु.क्र. पथकास नेमून दिलेले काम  पथकातील अधिकारी/कर्मचारी यांचे  पदनाम
1 विद्युत पुरवठा खंडीत करून महावितरणाची यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत कार्यकारी अभियंता (शहर) महावितरण कंपनी, औरंगाबाद
2 दुरध्वनी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत उपमहाव्यवस्थापक, भारत संचार निगम लि. औरंगाबाद
3 पाणी पुरवठा खंडीत करुन यंत्र सामग्री/ मालमत्ता सुरक्षित स्थळी हलविणेबाबत कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महानगरपालिका, औरंगाबाद
4 सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वळती करणेबाबत सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पोलीस आयुक्तालय, औरंगाबा
5 आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील वार्ड/ आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवणेबाबत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद
6 नकाशा तयार करुन निवासस्थाने पाडण्याची कार्यवाही करण्याअगोदर सदरील निवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना घरातून बाहेर काढणे इमारतीचा ताबा घेणे, याबाबतच्या आवश्यक त्या नोंदी ठेवणे आदी बाबी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद
7 आवश्यक वाहने यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकरी औरंगाबाद
8 आवश्यक वाहने, यंत्रसामग्री उपलब्ध करुन देणेबाबत 1. प्रादेशिक परिवाहन अधिकारी, औरंगाबाद
2. जिल्हा खनिकर्म अधिकारी औरंगाबाद
3. कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग,औरंगाबाद
4. कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, मनपा औरंगाबाद
9 पंचनामा पथक 1. 1.तहसिलदार खुलताबाद
2. 2. तहसिलदार कन्नड
10 शोध पथक 1. 1. तहसिलदार वैजापूर
2. 2. तहसिलदार गंगापूर
11 प्राप्त अजाची छाननी करणे मुख्याधिकारी, नगर परिषद कन्नड
12 बचाव साहित्य उपलब्ध करुन देणेबाबत 1. 1. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,  औरंगाबाद
2. 2. मुख्य अग्नीशमन अधिकारी, मनपा औरंगाबाद
13 समन्वय/प्रतिबंधात्मक आदेश 1. पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रमीण
2. नायब तहसिलदार, गृहशाखा जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
14 अग्नीशमन यंत्रणा व जबान सुसज्ज ठेवणेबाबत मुख्य अग्नीशमन अधिकारी, मनपा औरंगाबाद
15 चित्रिकरण करणारे कॅमेरे उपलब्ध करुन देणेबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
16 पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करणेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद
17 मजुर/हमाल पुरविणेबाबत सहायक आयुक्त कामगार, औरंगाबाद

0 Response to "औरंगाबाद : लेबर कॉलनी येथील जीर्ण झालेल्या इमारती पाडण्यासाठी विविध पथकांची नेमणूक"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe