-->
औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती

औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती

औरंगाबाद : नेत्रोपचारासाठी ख्यातनाम एएसजी डोळ्यांचे रुग्णालय औरंगाबादकरांच्या सेवेत औरंगाबाद : देशातील ख्यातनाम नेत्रोपचार रुग्णालयाची साखळी 'एएसजी' आपल्या व्यवसाय विस्तार धोरणांतर्गत औरंगाबादेत दाखल होत आहे. संस्थेची महाराष्ट्रातील तीसरी शाखा असून कांतीचौकात 'ए.जी. प्राईम हाऊस' साकरण्यात येत असल्याची माहिती ए एस जी हॉस्पिटल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर रुग्णालयात मोतीबिंदू(फेको), लॅसिक, व्हिटीओ रेटीना, ऑक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कॉर्निया, तिरळेपणा, न्युरो ऑप्थॅल्मॉलॉजी आदी नेत्ररोगांच्या श्रेणींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. औरंगाबादकरानां या सुविधा रविवारी देखील उपलब्ध करुन देण्याच्या इराद्याने आम्ही कटिबध्द राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. औरंगाबाद मधील प्रकल्पामध्ये डोळ्यांशी निगडीत सर्व आजार, जटील शस्त्रक्रिया, निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. एएसजी डोळयांचे रुग्णालय वेळोवेळी शिबीरांचे आयोजन करुन गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देतील. एएसजी समुहाची वाटचाल : सन 2005 मध्ये डॉ. अरुण सिंघवी आणि डॉ. शशांक गंग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजीआय समुहाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचा समुहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होत गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम नेत्रोपचार सुविधा देण्यासोबतच कोणताही भेदरभाव न करता समान उपचार पध्दती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने समुहाची स्थापना करण्यात आली.

या राज्यांमध्ये आहे अस्त्वि : एएसजीआय समुहाचे 14, राज्यामधील 33, शहरांमध्ये 40 रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, ओडीसा, बिहार, पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गोवा या राज्यांचा समावेश आहे.अंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयाची शाखा पूर्व अफिका खंडातील युगांडामधील कंपला येथे गेल्या पाच वर्षापासुन कार्यरत असून दुसरी शाखा तीन वर्षापुर्वी नेपाळमधील काठमांडू येथे साकारण्यात आली आहे.

मिळालेले मानाचे हे पुरस्कार : एएसजीआय समुहाला आजवर इंटरनॅशनल अचिव्हर्स (2009) उत्कृष्ठ सेवेसाठी वेलनेस हेल्थ (2010) आणि राजीव गांधी गोल्ड मेडल (2014) आदी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.


0 Response to "औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe