
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक संदर्भातील महत्वाची सविस्तर माहिती वाचा...
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१
Comment
औरंगाबाद: सन 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत राबविण्यात येणाऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे मतदाराची नोंदणी करावी. आगामी निवडणुकीत मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. 20 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तीच अंतिम मतदार यादी सन 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपलिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे, असेही त्यांनी कळविले आहे.
0 Response to "औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक संदर्भातील महत्वाची सविस्तर माहिती वाचा... "
टिप्पणी पोस्ट करा