-->
औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद: परिवहनेतर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका MH 20 FX ही सद्दस्थितीत सुरु असून सदर मालिकेतील नोंदणी क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी MH 20 FZ 0001 ते 9999 ही मालिका दिनांक 20 ऑक्टोबर पासुन सुरु करण्यात येईल.

ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेली फी च्या रक्कमेचा प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद यांच्या नावाचा धनाकर्ष (डी.डी.) व आपल्या ओळखपत्राच्या साक्षांकित प्रतीसह दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.00 पर्यंत परिवहनेत्तर शाखेमध्ये खिडकी क्र.16 वर जमा करावा. 

सदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त्‍ अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांनी दुसऱ्या कामाचे दिवशी दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद लिफाफामध्ये मुळ शुल्का व्यतिरिक्त अधिक रक्कमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोदंणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. तरी कृपया सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी. असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

0 Response to "औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe